मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने या वक्तव्याचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे आता सत्तारांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केली.
याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले आहे ते अतिषय निंदनीय आहे. त्यांनी मंत्रीपदावरून पायउतार करावं अशी मागणी राज्यपाल कडे केली असल्याचे म्हणाले आहेत. या सगळ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर लवकरात लवकर त्यांचा राजीनामा घ्या असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत.
या संपूर्ण घटनेबाबत अजित पवार यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही असे जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, अजित पवारांनी भाष्य करण्याची गरज नाही ते त्यांच्या आजोळी काही कारणास्तव गेले आहेत आणि त्यांच्या बहिणीविषयी कोणीतरी आक्षेपार्ह बोलणं यांवर त्यांनी भाष्य करण्याची गरज नाही तसेच अजित पवारांनी प्रतिक्रिया द्यावी अशी अपेक्षा करू नका असंही यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. त्यामुळे राज्यातील राजकारण अजून तापण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?