शरद पवारांना राजकारणात हरवण्याचा प्रयत्न म्हणजे सुर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार – जयंत पाटील

0
47
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भुमिका स्पष्ट केली. रविवारीही अजित पवार यांनी ट्विट करुन आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचे सांगितले. मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले.

अजित पवारांच्या सदर निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांत संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. मात्र या सर्व घडामोडींना शरद पवार खंबीरपणे तोंड देत असल्याने त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते जयंत पाटील यांनी शरद पवारांना राजकारणात हरवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सुर्याला बॅटरी दाखवल्यासारखे आहे असे म्हटले आहे. तसेच पवार साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात कालही सुर्य होते आजही आहेत आणि उद्याही कायम असतील असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here