हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पजक्षत नेत्यांमध्ये काही तरी बिनसले असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होत्या. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्वाचे विधान केले. “राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसच्याच विचाराने चालतो, काँग्रेसची तत्त्व हीच राष्ट्रवादी पक्षाची तत्त्व आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस ही काही वेगळी काँग्रेस नाही. शरद पवार यांचं उभं आयुष्य काँग्रेस पक्षामध्ये गेलं असल्याचे पायही यांनी म्हंटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सांगली जिल्ह्यातील खानापूर मधील माजी आमदार संपतराव माने यांच्या वारसदारांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी मध्येपक्षप्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाच्या निर्णयाबाबत सांगायचे झाले तर आमच्या पक्षाचे निर्णय मुंबईत होतात आणि काँग्रेसचे निर्णय मात्र दिल्लीत होतात, हा दोन्ही पक्षांमधील एवढाच फरक आहे.
राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसच्याच विचाराने चालतो, काँग्रेसची तत्त्व हीच राष्ट्रवादी पक्षाची तत्त्व आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही काही वेगळी काँग्रेस नाही. एकेकाळी आमच्या पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब यांनी आपलं उभं आयुष्य काँग्रेस पक्षामध्ये घालवलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या धोरण आणि विचारांमध्ये पक्ष बदल करत नसल्याची देखील आठवण पाटील यांनी यावेळी करून दिली आहे.