व्हॅलेंटाइनसाठी Jio ने आणल्या जबरदस्त ऑफर्स, ग्राहकांना मिळणार 12GB फ्री डेटा

Jio
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हॅलेंटाईनला डोळ्यापुढे ठेवून Jio ने काही नवीन ऑफर लाँच केल्या आहेत. ज्याअंतर्गत ग्राहकांना अतिरिक्त डेटा दिला जातो आहे. यासोबतच फूड आणि गिफ्ट ऑर्डरकरण्यावर सूट देखील दिली जाणार आहे. चला तर मग जिओच्या व्हॅलेंटाईन डे ऑफरबाबतही माहिती जाणून घेऊयात.

Jio Valentine's Day Offer Introduced; Check out the Benefits! | Beebom

या व्हॅलेंटाइन डे ऑफर अंतर्गत ग्राहकांना चार अतिरिक्त फायदे दिले जात आहेत. यामध्ये ग्राहकांना 12GB 4G डेटा आणि Ixigo वर 4,500 रुपये किंवा त्याहून जास्तीच्या फ्लाइट बुकिंगवर 750 रुपयांपर्यंतची सूट दिली जाईल.

त्याचप्रमाणे, Ferns and Petals वर कमीत कमी 799 रुपयांच्या ऑर्डरवर 150 रुपयांची सूट मिळेल, तसेच मॅकडोनाल्डमध्ये 199 रुपये किंवा त्याहून जास्तीचा खर्च केल्यास 105 रुपयांचा फ्री बर्गर मिळेल.

Jio Valentines Day Offer

12GB अतिरिक्त 4G डेटा रिडीम करण्यासाठी ग्राहकांना MyJio App च्या व्हाउचर टॅबला भेट द्यावी लागेल. या अतिरिक्त डेटासाठी आपल्या सध्याच्या चालू प्लॅननुसार व्हॅलिडिटी मिळेल.

फ्लाइट बुकिंगवर 750 रुपयांची सूट मिळण्यासाठी तर MyJio App मधील Coupons and Winnings टॅबवर जाऊन कूपन कोड डिटेल्स तपासा. यानंतर Ixigo च्या माध्यमातून सवलतीचा लाभ घेता येऊ शकेल. या टॅबवर Ferns and Petals डिस्काउंट देखील उपलब्ध असेल.

Jio Introduces New Independence Day Offers; Check Them Out! | Beebom

McDonald च्या ऑफरबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये ग्राहकांना 105 रुपयांमध्ये McAloo Tikki किंवा Chicken Kebab burger मिळेल. यासाठी ग्राहकांना 200 रुपये किंवा त्याहून जास्तीची ऑर्डर द्यावी लागेल. यासाठीचे कूपन कोड देखील वरील ऑफर्सच्या ठिकाणी दिसून येईल.

हे जाणून घ्या कि, Jio ची ही व्हॅलेंटाईन डे ऑफर 249 रुपये, 899 रुपये आणि 2999 रुपयांच्या प्लॅनवर उपलब्ध असेल. मात्र जे ग्राहक 10 फेब्रुवारी किंवा त्यानंतर हे प्लॅन खरेदी करतील, त्यांनाच या ऑफरचा फायदा मिळेल. तसेच, MyJio App द्वारे रिचार्ज केल्यानंतर 72 तासांच्या आत कूपन येतील, जे 30 दिवसांसाठी व्हॅलिड असतील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/en-in/valentine-offer-terms-conditions

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ