हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या करोनाबाबतच्या कामातील धडाडीचे कौतुक केलं आहे. ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हृदयाची काही वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झालेली आहे. ती कशा प्रकारची होते हे मी सांगू इच्छित नाही. पण अशा व्यक्तिने ताण-तणावापासून लांब राहिलं पाहिजे, असं सांगितलं जातं. पण आज युद्धाची परिस्थिती असताना या युद्धाला ते धीरोदत्त सेनापती सारखे सामोरे जात आहेत. महाराष्ट्राला धीर देत आहेत. मला त्यांचा अभिमान आहे”, असं ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.
महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या माहितीसाठी.
मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव ठाकरे यांची काही वर्षांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. ती कशा प्रकारची होती हे मी इथे सांगू इच्छित नाही. पण, अशा व्यक्तीने ताण-तणावापासून लांब रहावे असे सांगितले जाते. आपण सगळ्यांनी त्यांचे कौतुक करायला पाहिजे.— Office of Dr. Jitendra Awhad (@AwhadOffice) March 20, 2020
राज्यावर करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: जातीने लक्ष देऊन परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून ठाम भूमिका घेऊन जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूरमध्ये सर्व काही ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.याशिवाय अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेणं, केंद्रापासून ग्रामपंचायती स्तरापर्यंतच्या अधिकारी-कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवून त्यांनी उत्तम प्रकारे परिस्थिती हाताळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कामाची धडाडी पाहूनच आव्हाड यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
करोनाविरुद्धच्या लढाईत बॉलीवूडकर आले समोर; पहा व्हिडिओ..
कोरोनाच्या संकटात माणुसकी सोडू नका – मुख्यमंत्री ठाकरे
जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद राहणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
व्हिडिओ: ऐका हो! करोना पोवाडा..कोल्हापूरच्या शाहिराचा अनोखा जनजागृती पोवाडा
लोकलच्या गर्दीत केवळ ३० टक्के घट; लोकल बंद करण्याचा आरोग्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा