हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत खुर्ची घेऊन जात असल्याचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन भाजपा नेते टीका करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र संजय राऊत यांच्या कृतीचे कौतुक केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ शेअर करत राऊतांचे कौतुक करत भाजपवर मात्र शरसंधान साधले.
संजय राऊत यांनी काल शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची दिली. शरद पवारांची प्रकृती पाहता कोणताही माणुसकी असलेला माणूस त्यांना खुर्ची देण्याचा विचार करेल. जेव्हा आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभं राहतोच, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे. तो काय आहे, कोण आहे हेदेखील आपण पाहत नाही. वयोवृद्ध व्यक्ती आली आणि आपल्याला जर त्यांना काय अडचणी आहेत माहिती असेल तर ते करतोच. संजय राऊत यांनी तसं केलं असेल तर त्यांच्यातील माणुसकीचे संस्कार दिसलेत. त्याच्याबद्दल एवढी चर्चा कशासाठी? हे महाराष्ट्रात काय सुरु आहे?,” अशी खंत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
नमन @rautsanjay61 #sanskar #Sanskari #Sanskruti pic.twitter.com/ZGZUaUKY4C
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 9, 2021
मुख्यमंत्री आल्यानंतर कितीही मोठा मंत्री असला तरी तो उठून उभा राहतो. हा त्या मुख्यमंत्रीपदाचा आदर आहे. शरद पवार या व्यक्तिमत्वाबद्दल, वयाबद्दल, त्यांच्या शारिरीक अस्वस्थेबद्दल ज्यांना माहिती आहे त्यातील संजय राऊत आहेत. त्यांनी तात्काळ खुर्ची आणली आणि दिली त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि नमन करतो’, असंही जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणाले.