Tuesday, January 7, 2025

राजकीय व्यासपीठावर नवा जॉनी लिव्हर सापडलाय…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाणे येथील मनसेच्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी महा विकास आघाडीमधील नेत्यांवरही हल्लाबोल केला. यावेळी ठाकरेंनी जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, जितेंद्र आव्हाड, मंत्री छगन भुजबळ तसेच खासदार संजय राऊत यांची आपल्या स्टाईलने मिमिक्री केली. दरम्यान त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. यावरून आव्हाड यांनी राज ठाकरे यांचा जॉनी लिव्हर असा उल्लेख केला आहे.

राज ठाकरे यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधत ज्या भागात अतिरेकी सापडले त्या मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाड निवडून येतात असे म्हंटले आहे. तसेच मुंब्र्यातून आत्तापर्यंत मुसक्या आवळलेल्या अतिरेक्याची यादीच भर सभेत जनतेला वाचून दाखवली आहे. यावरून आता आव्हाड याणीही राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंमध्ये जातीयवाद ठासून भरला आहे. राजकीय व्यासपीठावर आता नवा जॉनी लिव्हर सापडला आहे, असे आव्हाड यांनी म्हंटले आहे.

काय केली आहे राज ठाकरे यांनी टीका?

ठाणे येथील सभेत काल राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर घणाघाती टीका केली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, 24 ऑगस्ट 2001 सीमीच्या 6 हस्तकांना मुंब्र्यातून अटक, 20 डिसेंबर 2001 अबु हमजा, 16 मार्च 2020 हिजबुल मुजाहिद्दीनच्या 4 अतिरेक्यांना मुंब्र्यातून अटक करण्यात आली. 23 जानेवारी 2004 एक दहशतवादी जेरबंद, २०१६ ला ताब्यात घेतलाल आयसीसचा मोरक्या, 16 मे 2003 मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी एकाला अटक, रिजवान मोबिन या संशयित अतिरेक्याला अटक, 26 जानेवारी 2019 एका दहशतवाद्याला अटक, अशी दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईची यादीच देत अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून आव्हाड निवडून येतात, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला.