पवारांच्या घरी हल्ला करणाऱ्यांचा हेतू…; आव्हाडांच्या दाव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी बहुसंख्य जमावाने दगडफेक केल्यानंतर राज्यातील वातावरण चिघळले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. शरद पवारांना शारिरीक इजा करायचा हेतू कर्मचाऱ्यांचा होता अस त्यांनी म्हंटल.

याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हंटल की, परवा साहेबांच्या (शरद पवार) घरी हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वच्छ नव्हता. त्यांनी शरद पवारांच्या घराची रेकी केली होती. त्यांना शरद पवारांना शारिरीक इजा करायची होती. महाराष्ट्राचं नशीब असं काही घडलं नाही”, असं म्हणत त्यांनी खळबळ उडवुन दिली आहे.

 

दरम्यान, शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते याना अटक करण्यात आली असून ते 2 दिवसाच्या पोलीस कस्टडीत आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करत असून शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

Leave a Comment