Saturday, January 28, 2023

खुनाचा गुन्हा चालेल पण विनयभंगाचा नाही; जितेंद्र आव्हाड भावुक

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माझ्यावर एकवेळ खुनाचा गुन्हा दाखल केला असता तरी चालले असते पण विनयभंगाचा गुन्हा मला मान्य नाही. मी आयुष्यात ते काम कधी केलं नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आव्हाड यांनी आपला आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली असताना आव्हाड भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, माझ्यावर इतर कोणतेही गुन्हे लावले असते तर चालले असत पण जे मी कधी केलच नाही तो विनयभंगाचा गुन्हा मला मान्य नाही. समाजामध्ये माझी मान खाली जाईल अशा पद्धतीचा गुन्हा माझ्यावर नोंदवायचा हा षडयंत्राचाच भाग असू शकतो. राजकारण करा मी कधी कोणासोबत भेदभाव केला नाही असं आव्हाड म्हणाले . इतक्या खालचं राजकारण सुरु असेल तर त्यापेक्षा याच्यात न राहिलेलं बर असेही ते म्हणाले.

- Advertisement -

तुम्हाला सर्वाना माझा स्वभाव माहित आहे . मी कलम ३५४ आणि कलम ३७६ साठी जन्माला आलेलो नाही. हे आरोप माझ्या हृदयाला लागले असं म्हणताना जितेंद्र आव्हाड यांचा कंठ दाटून आला. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण महाराष्ट्रात होऊ नये नाहीतर घरे उध्वस्त होतील असेही आव्हाड म्हणाले.