Saturday, January 28, 2023

सभा ओवैसींची अन् नारा मोदींचा; काळे झेंडेही दाखवले

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच एमआयएम सुद्धा गुजरात मध्ये निवडणुकीत उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे सुरत पूर्व मतदारसंघात एका सभेला संबोधित करताना उपस्थित लोकांनी मोदी मोदींचे नारे दिले तसेच काळे झेंडेही दाखवले.

सुरत पूर्व मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ओवेसी पोहोचले होते. ते पक्षनेते व माजी आमदार वारीश पठाण यांच्यासह जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. ओवैसी यांनी भाषण सुरू करताच सभेत उपस्थित लोकांनी त्यांचा निषेध करण्यास सुरुवात केली. काळे झेंडे दाखवत मोदी-मोदीच्या घोषणा देऊ लागल्या.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात एआयएमआयएमच्या प्रवक्त्याने ओवेसींना टार्गेट करत वंदे भारत ट्रेनवर दगडफेक केल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी हे दावे फेटाळून लावले. याआधी आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनाही गुजरात मध्ये विरोधाचा सामना करावा लागला होता. वडोदरा विमानतळावरून बाहेर पडताना त्यांच्यासमोर मोदी-मोदीच्या घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान, गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या राज्यात आम आदमी पक्षाने एंट्री केल्याने यंदा भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. एआयएमआयएमने सुद्धा काही अल्पसंख्याकबहुल जागांसाठी उमेदवार जाहीर केले असून आणखी उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.