हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा आरोप केल्यांनतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आव्हाडांवर टीका केली होती. तसेच त्यांचे जूने प्रकरण बाहेर काढत ज्यांनी घरी बोलावून एकाला बेदम मारहाण केली, त्यांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हंटल होत. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत चित्रा वाघ यांचा समाचार घेतला आहे. चित्राताई आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या नेत्यांच अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारीत झालं असतं तर आपण काय केलं असतं असा थेट सवाल आव्हाडांनी केला आहे.
ज्या माणसाने 2016 ते 2020 माझा पाठलाग केला. ट्वीटर फेसबुक चा वापर करत बदनामी केली. ब्लॉक केल्यानंतरही दुसऱ्या मार्गाने तो मला त्रास देतच राहिला टीका करणाऱ्यांनो तुमच्या भावाच,तुमच्या वडिलांच,किंवा तुमच्या स्वतःच अशाप्रकारे नग्न छायाचित्र काढल गेलं असतं तर किंवा इतके वर्षे त्रास इतके वर्षे त्रास दिला गेला असता तर आपण काय केलं असतं? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
इतके वर्षे त्रास दिला गेला असता तर आपण काय केलं असतं?
चित्राताई आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या नेत्यांच अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारीत झालं असतं तर आपण काय केलं असतं. याचे उत्तर कधीतरी द्या.
2016 ते 2020 त्याने काय केलं हे जरा कधीतरी बोलावून विचारा आणि मग टीका करा.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 15, 2022
चित्राताई आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या नेत्यांच अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारीत झालं असतं तर आपण काय केलं असतं. याचे उत्तर कधीतरी द्या. 2016 ते 2020 त्याने काय केलं हे जरा कधीतरी बोलावून विचारा आणि मग टीका करा अस म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला.
चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या होत्या –
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाचा आरोप केल्यांनतर आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला . यांनतर चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला होता. “माझा संविधानावर विश्वास आहे, असे जितेंद्र आव्हाड नेहमी म्हणतात. मग त्यांना वाटत असेल गुन्हा केलेला नाही, तर त्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवावा. आमदारकीचा राजीनामा देऊ, असं म्हणून पोलिसांवर जर दबाव आणण्याचा प्रयत्न असेल तर ते कधीही शक्य होणार नाही. ज्यांनी घरी बोलावून एकाला बेदम मारहाण केली, त्यांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी जोरदार टीका चित्रा वाघ यांनी केली होती.