हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दररोज नियमित व्यायाम केल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. आपल्या नियमित च्या व्यायामाने अनेक रोगांपासून मुक्तता मिळते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हवामानातील बदलामुळे अनेक वेळा माणसे आजारी पडतात. त्या काळात व्यायामाचा जास्त फायदा होतो. रोगप्रतिकार शक्ती वाढल्याने लवकर कोणत्याही आजाराला बळी पडू शकत नाही.
जर तुम्ही घरातल्या घरात व्यायाम केला तर तुम्हाला कोठे बाहेर जावे लागणार नाही आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही शरीर तंदुरुस्त ठेवू शकता. तुम्ही घरगुती पद्धतीने घरातल्या घरात व्यायाम करू शकता. दोर उड्या मारणे हा सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा व्यायाम आहे. नियमित दोर उड्या घेतल्याने आपल्या शरीरातील हाडे बळकट होण्यास मदत होते. १५ ते २० मिनिटे दररोज व्यायाम केल्याने खांदे ,पोट , हात या अवयवांवर जास्त ताण न पडता सर्व अवयव मजबूत होण्यास मदत होते.
खेळाडूंसाठी हा व्यायाम सर्वात जास्त उपयुक्त असतो. त्यामुळे फुफुसाचा आजार बरा होण्यास मदत होते. दोर उड्या मारल्याने शरीर आणि शरीराच्या सर्व भागांवर नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच या व्यायामामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.