बाहेर लोकांना उपदेश अन् घरी पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या राक्षसी बुवाचा व्हिडिओ वायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल सगळेजण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. सोशल मीडियाचे काही तोटे असले तरी याचे बरेच फायदेही आहेत. या सोशल मीडियामुळे अनेकांना रातोरात प्रसिद्धी मिळाली आहेत तर अनेक अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचे कामसुद्धा सोशल मीडिया करत असते. आपल्याला अनेक वेळा सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडिओ पाहायला मिळत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

https://www.facebook.com/watch/?v=812010939454098

हा व्हिडिओ कल्याण तालुक्यातील द्वारली या गावामधील आहे. या गावातील स्वतःला बुवा आणि महाराज समजणाऱ्या गजानन चिकणकर याने आपल्या पत्नीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. या व्यक्तीला दोन बायका असून तो भक्तांना ज्ञानाच्या गोष्टी सांगत प्रबोधन करत असतो. त्याची पहिली पत्नी वयस्कर असल्याने त्या काम करत नसल्याने तो अनेकदा आपल्या पत्नीला मारहाण करत असतो. हा व्हिडिओ त्या बुवाच्या नातवानेच व्हायरल केला आहे.हा व्यक्ती आपल्या पत्नीला अमानुषपणे मारहाण करत असताना आजबाजूला इतरही अनेक महिला आहेत, मात्र कोणीही या महिलेच्या मदतीला आले नाही. हा व्यक्ती महिलेला वारंवार परत असं करशील का? असा सवाल करत लाथेने तसेच हातात बादली घेऊन मारताना दिसत आहे.

हा व्यक्ती एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने महिलेला हाताला धरुन ओढत भिंतीवर आदळून तिला घरातून बाहेर काढण्यासाठी तो खुर्चीवरून खाली ओढत असल्याचे दिसत आहे. या सगळ्या मारहाणीत त्या महिलेच्या हाताला दुखापत झाली आहे. व्हिडिओमध्ये ही महिला वयस्कर असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताच मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीवर काही कारवाई होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.