कराडच्या विद्यानगरीत कॅफेच्या नावाखाली अश्लिल चाळे, कपल कॅफेंवर कारवाईची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिमिधी | सकलेन मुलाणी

कराड मधील शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणार्‍या विद्यानगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघड़कीस आला आहे. कॉफी कपल कॅफेच्या नावाखाली महाविद्यालयीन तरुण तरुणींचे अश्लील चाळे सुरु असल्याचं समोर आलं आहे. स्थानिक रहिवाशी आणि क्रांती महिला संघटनेच्या महिलांना याबाबत संशय आल्यानंतर नागरीकांनी छापा टाकल्या नंतर सदर प्रकार उघ झाला.

हाती आलेल्या माहितीनुसार, क्रांती महिला संघटनेच्या महिलांनी विद्यानगर परिसरात सक्रिय असलेल्या कपल कॅफेंची रेकी करून पाहणी केली. यावेळी कॅफेच्या नावाखाली तिथे अश्लिल चाळे होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर संघटनेच्या महिलांनी जिल्हा पोलीस अधिकार्‍यांशी बातचीत केली व कारवाईची मागणी केली. मात्र पोलीस कारवाईला दिरंगाई होत असल्याने आज विद्यानगर परिसरातील महिलांनी एकत्र येत सदर कॅफेंवर छापा टाकला. यावेळी ७ तरुण तरुणीना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या पालकांना ही माहिती देणार असल्याच महिलांनी सांगितलं.

स्थानिक आणि क्रांती संघटनेच्या महिला या प्रकरणानंतर आक्रमक झाल्या असून त्यांनी हे कॅफे बंद करण्याची मागणी डीवायएसपी यांना तोंडी आणि लेखी स्वरुप‍त केली आहे. सदर घटनेवर कराड शहर पोलीस कारवाई करणार का असा संतप्त सवाल नागरीकांकडून विचारला जात आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही तर या केफेची तोड़फोड़ आम्हीच करू असा निर्णय या महिलांनी घेतला आहे.

गेल्या काही वर्षापासून विद्यानगर परिसर शिक्षणाचं माहेर घर म्हणून प्रसिद्ध आहे. महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने कॅफे कल्चर निर्माण करून महाविद्यालय तरुण तरुणींना या वेगळ्या मार्गाला लावण्याचे कारस्थान होत असल्याचं क्रांती संघटनेचे म्हणणे आहे. सदर घटनेचा सखोल तपास करुन योग्य ती कारवाई करु अस आश्वासन कराड पोलीसांनी दिले आहे.

https://youtu.be/tul2-8Xn2Lg

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे – 

पवारांची जादू, उदयनराजे व शिवेंद्रराजे एक दिलाने निवडणूक लढवणार

नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजेंनी खाल्ली एकत्र मिसळ, उदयनराजेंना बसणार झणझणीत ठसका?

उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले

पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील

Leave a Comment