बंगरुळु | भाजपचे नेते आणि कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकला आहे. आज विधानसभेत आवाजी मतदानाने या ठराव मंजूर करण्यात आला. ठराव मांडल्यावर बी.एस येडियुरप्पा यांनी भाजपच्या बाजूने १०६ आमदार असल्याचा दावा केला आणि सभागृहातील आपल्या बाजूच्या आमदारांना ठराव मंजूर करण्याचे आवाहन देखील केले.
Winning the trust vote is, taking one more step closer towards a stable and strong administration. Will uphold the trust by ensuring transparent and accountable governance. I would like to thank the citizens, MLAs and each and every BJP Karyakartha for the trust placed in me.
— B.S. Yediyurappa (@BSYBJP) July 29, 2019
कर्नाटक विधानसभेत कुमार स्वामी यांच्या सरकारने बहुमत गमावल्याने कर्नाटकात सत्तांतर होणार हे अटक बनले. त्यानंतर १७ आमदार बंडखोर झाले आणि त्यांनी सरकारमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर झालेल्या कर-नाटकात भाजपने बाजी मारली. आजपर्यंत सर्वात मोठा पक्ष असणारा भाजप विरोधात बसल्याचे दुःख भाजप नेत्यांच्या मनात होते म्हणून येडियुरप्पा यांनी सरकार पडण्याचा सतत प्रयत्न केला होता.
दरम्यान विश्वासमत प्रस्ताव भाजपने जिंकल्याने येडियुरप्पा आपल्या मंत्री मंडळाचा विस्तार करण्यास मोकळे झाले आहेत. तसेच कर्नाटक सरकारचे अद्याप बजेट मांडले गेले नाही त्यामुळे ते कर्नाटक सरकारचे बजेट मांडण्यासाठी राज्यपालांशी चर्चा करून मार्ग काढू शकतात. त्याचप्रमाणे या संदर्भात ते विधानसभेत घोषणा देखील करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
इंदापूरच्या जागेवरून पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीत कलगीतूर ; जागा सोडण्यास शरद पवारांचा नकार
गणपतराव देशमुखांची विधानसभा निवडणुकीतून माघार ; या कारणामुळे निवडणूक लढणार नाहीत
कराड येथील जुना कृष्णापूल कोसळला
मुंबईनंतर राष्ट्रवादीला बसणार नव्या मुंबईमध्ये झटका ; पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपच्या वाटेवर
पाथरी विधानसभा ; आयात उमेदवारांना नो एंट्री ; भूमिपुत्रांची होणार चलती