हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत काही दिवसांपूर्वी पोलिसांसोबत झालेल्या एका झटापटीत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सध्या या घटनेचा संबंध हा अमेरिकेतील वर्णव्देषाशी जोडला जात आहे. याचा परिणाम असा झाला कि अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांनी अमेरिकन प्रशासनाविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाला थोपवण्यासाठी गोळीबार करण्याचा आदेशही नुकताच देण्यात आलेला आहे. या गोळीबारात अभिनेता केन्ड्रिक सॅम्पसन हा जखमी झाला आहे. त्याला एकूण सात गोळ्या लागलेल्या आहेत.
जॉर्ज फ्लॉइडच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूमुळे अमेरिकेतील कृष्णवर्णीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी आपला राग व्यक्त करण्यासाठी थेट व्हाईट हाऊससमोर जाऊन निदर्शने केली. या आंदोलनात अभिनेता केन्ड्रिक सॅम्पसन हादेखील सामिल झाला होता. दरम्यान झालेल्या पोलिसांकडून करण्यात आलेल्या रबरी गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला एकूण सात गोळ्या लागल्या आहेत. पोलीस फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्याच्यावर लाठीहल्ला देखील केला, असा आरोप त्याने केला आहे.
केन्ड्रिकने आपले हे आरोप सिद्ध करण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस आंदोलन कर्त्यांवर लाठीमार करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूमुळे अमेरिकेतील वातावरण सध्या प्रचंड पेटलेलं आहे. लोक कोरोना विषाणूची पर्व न करता रस्त्यांवर येऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात घोषणा देत आहेत. या आंदोलनाला शकिरा, टेलर स्विफ्ट, मॅडोना, लेडी गागा यांसारख्या अनेक मोठ्या हॉलिवूड कलाकारांनीही आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही सेलिब्रिटींनी तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला मतदानच करणार नाही अशी धमकीच ट्रम्प याना द्यायला सुरुवात केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.