“संजय राऊत यांना इतकी मस्ती गुर्मी असेल तर…”; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या हे पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशन, पुणे महा नगरपालिका आणि संचिती हॉस्पिटल या ठिकाणांना भेट देण्यासाठी आज सकाळी दाखल झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “संजय राऊत यांना इतकी मस्ती आहे, इतकी गुर्मी आहे. कि महाराष्ट्रातील लोकांचे जीव घेतील. महाराष्ट्रांच्या लोकांची हत्या करुन काही होणार नाही, असे वाटत असेल तर ते मुर्खाच्या नंदनवनात राहतात,” अशी टीका सोमय्या यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्याकडून कोरोना काळात संजय राऊत यांच्या साथीने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी लागणार आहे. दुसऱ्या राऊत कडून संजय राऊतांकडे पोहोचला असेल तर जवाब द्यावा लागेल.

महाविकास आघाडी सरकारच्यावतीने चालवल्या जात असलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. घोटाळेबाज कंपनीला कोव्हीड सेंटरचे कंत्राट कसे काय देण्यात आले? असा सवाल यावेळी सोमय्या यांनी उपस्थित केला.