हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाच्या काल पार पडलेल्या बैठकीत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घराच्या अनधिकृत बांधकामासाठीचा दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारने आता शिवसेनेचा आमदार आहे म्हणून त्यांची चोरी, गुन्हे माफ केले आहे. पण, महाराष्ट्राची जनता या घोटाळेबाज सरकारला कदापी माफ करणार नाही. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या लोकांना मुर्ख समजतात का? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणले की, गेल्या आठवड्यात लोकायुक्तांच्या समोर एक सुनावणी पार पडली होती. त्या सुनावणीवेळी प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यांच्या कडून सगळा दंड व व्याज वसूल करून कारवाई केली जाणार असे ठाकरे सरकारने मान्य केले होते. आता ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळांनी सरनाईक यांना दिलासा दिला आहे. ठाकरे सरकारचे हे प्रताप महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येत नाही का? उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या लोकांना मुर्ख समजतात का? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
वास्तविक पाहता ठाकरे सरकार चुकीच्या पद्धतीचे काम करत आहे. प्रताप सरनाईक घोटाळेबाज आहेत. तरीही त्यांना मदत का केली जात आहे? पण, मुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना चुकीचा संदेश देऊ नका. त्यांना कशाला वाचवता आहात? मुख्यमंत्री लोकायुक्ताच्या समोर सांगतात, की आम्ही प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करू. मग ठाकरे सरकार त्यांना का पाठीशी घालतात? असेही यावेळी सोमय्या यांनी म्हंटले.