हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार रोखण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस, राष्टवादीने खूप प्रयत्न केले. मात्र. घोडेबाजार हा झालाच. दरम्यान अपक्ष आमदार दुतल्यानांतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दगाबाज अपक्षांची नावे जाहीर करत निशाणा साधला. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांनी आमदारांना थेट बंदूक दाखवूनच धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी दिल्लीत आज त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
राज्यसभा निवडणुकीत आमदारांवर दबाव टाकत त्यांना धमकावण्यात आल्याची तक्रार सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावेळी त्यांनी आयोगाकडे तक्रार केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यसभेची ही निवडणूक शिवसेनेने भ्रष्ट केली आहे. या निवडणुकीत सर्व आमदारांनी मतदान केले. मात्र आपल्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातील आमदारांवर मोठा दबाव आणला आहे.
एवढंच नाही तर संजय राऊत यांनी थेट आमदारांना बंदूक दाखवून धमकीच दिली आहे. तसेच महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयामार्फतही आमदारांवर दबाव आणला जात असल्याचे सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. सोमय्यांच्या आरोपांना आता राऊत काय उत्तर देणार हे पहावं लागणार आहे.