हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेते सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टीने नुकतंच लग्नगाठ बांधली. केएल राहुल आणि अथिया शेट्टीने 23 तारखेला खंडाळा येथील फार्महाऊसवर थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर आता केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.
दाक्षिणात्य पद्धतीने पार पडलेल्या विवाह सोहळ्याला बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील 100 पाहुणे आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी पार पडलेल्या हळदी समारंभात हे सेलिब्रेटी कपल जल्लोष करताना दिसून आले.
दोघांनी एकमेकांना हळदी लावत आपल्या खास क्षणांना आणखीनच खास बनवलं आहे. या स्टार कपलचे फोटो समोर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अखेर नुकतेच लग्न करून या दोघांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.
अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाच्या निमित्ताने अथिया शेट्टीचे वडील आणि बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी यांच्या पोषाखाची चांगली चर्चा झाली होती. त्यांनी पेस्टल गुलाबी रंगाचे धोतर आणि कुर्ता घातला असून त्यांच्यासोबत मुलगा अहान शेट्टी यांनी पापाराझींना मिठाई देखील दिली होती.