राहुल-अथियाच्या लग्नासाठी मंडप सजला : ‘इतके’च पाहुणे राहणार उपस्थित; विवाह सोहळ्यापूर्वी घातली ‘ही’ अट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बॉलीवूडमध्ये एका कपलच्या लग्नाची चर्चा चांगलीच सुरु आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी, अभिनेत्री अथिया शेट्टी होय. केएल राहुलच्या मुंबईतल्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली असून येत्या 23 जानेवारी रोजी केएल राहुल आणि अथिया लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाला फक्त 100 पाहुणे उपस्थित राहणार असून कार्यक्रमात कोणीही मोबाईल न वापरण्याच्या तसेच त्यातील व्हिडीओ सोशल मीडियात शेअर न करण्याची अट घालण्यात आली आहे.

खंडाळ्यातील जश्न बंगल्यासमोर असलेल्या मैदानात आथिया आणि राहुल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. भारतीय संघाचा उप कर्णधार असलेल्या केएल राहुलने क्रिकेट क्षेत्रातील अनेक मोठ्या व्यक्तींनाही आपल्या लग्नाचे आमंत्रण दिलेले आहे.

https://www.instagram.com/p/Cm3vvvlLae1/?utm_source=ig_web_copy_link

लग्नसोहळ्यास ‘ही’ खास व्यक्ती राहणार उपस्थित

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नसोहळ्याला जॅकी श्रॉफ, सलमान खान, अक्षय कुमार, एम. एस. धोनी, विराट कोहली हे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. या लग्नाला बॉलिवूडमधील मोजकेच सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

https://www.instagram.com/p/CkkrIkBrZZc/?utm_source=ig_web_copy_link

अशी झाली होती दोघांची पहिली भेट

2019 मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून अथिया आणि केएल राहुल या दोघांची भेट झाली. पहिल्या भेटीतच दोघांची चांगली मैत्री झाली होती. त्यावेळी फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनी सुद्धा सोशल मीडियावर अथियाच्या डेटिंग लाइफविषयी माहिती दिली होती. 2021 मध्ये अथियाच्या वाढदिवशी केएल राहुलने तिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत रिलेशनशिप जाहीर केलं होतं.

https://www.instagram.com/reel/CnsGE73jq-L/?utm_source=ig_web_copy_link

‘या’ चित्रपटात केलं आहे आशियाने काम

अथियाने 2015 मध्ये ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती मुबारकां (2017) आणि मोतीचूर चकनाचूर (2019) या दोन चित्रपटांमध्येच झळकली आहे. अथिया लवकरच फुटबॉलपटू अफशान आशिकचा बायोपिक ‘होप सोलो’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.