भारताला मोठा धक्का ! KL Rahul ला कोरोनाची लागण, T20 सीरिजमधून बाहेर

KL Rahul
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुलसमोरच्या (KL Rahul) अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहेत. नुकतेच दुखापतीतीतून सावरलेल्या केएल राहुलची (KL Rahul) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तो वेस्ट इंडिज विरुद्ध 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 सीरिजमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बोर्डाच्या बैठकीनंतर राहुलची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे.

केएल राहुलने (KL Rahul) गुरूवारी बँगलोरच्या एनसीएमध्ये लेव्हल 3 कोच सर्टिफिकेशन कोर्समध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांना संबोधित केलं होतं. काहीच दिवसांपूर्वी राहुलच जर्मनीमध्ये हर्नियाचं ऑपरेशन झालं होतं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या वनडे सीरिजसाठी त्याला आराम देण्यात आला आहे.

आयपीएल 2022 नंतर केएल राहुल भारताकडून एकही सामना खेळला नाही आहे. हार्नियाच्या दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज आणि मग त्यानंतर इंग्लंड दौऱ्याला मुकला आहे. आता कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे कदाचित तो वेस्ट इंडिज दौऱ्यालादेखील मुकण्याची शक्यता आहे. यापूर्वीदेखील केएल राहुलला (KL Rahul) अनेकवेळा दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर राहावे लागले होते.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर