IND vs ENG : KL Rahul इंग्लंड सीरिजमधून बाहेर, टीम इंडियाला मोठा धक्का!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. भारताचा विकेटकिपर बॅट्समन लोकेश राहुल (KL Rahul) हा दुखापतीमुळे या सिरीजमधून बाहेर पडला आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड दौऱ्यात 7 मॅच खेळणार आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही राहुल खेळला नाही. रोहित शर्माला आराम दिल्यामुळे राहुलला टीम इंडियाचं कर्णधार करण्यात आले होते. पण सीरिज सुरू व्हायच्या एक दिवस आधी राहुला मांडीची दुखापत झाली होती त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेच्या सीरिजला देखील मुकला. केएल राहुलला (KL Rahul) उपचारासाठी जर्मनीला पाठवण्यात येईल, असं बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या सुरूवातीला राहुल जर्मनीला जाईल. राहुलचे (KL Rahul) इंग्लंड दौऱ्यावर न जाणं टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे कारण राहुल (KL Rahul) टीमचा प्रमुख खेळाडू आहे. तसंच रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये राहुलला टीम इंडियाचं उपकर्णधार करण्यात आलं आहे. राहुलने (KL Rahul) भारताकडून 43 टेस्ट, 42 वनडे आणि 56 टी-20 मॅच खेळल्या आहेत.

इंग्लंडमध्ये भारताच्या 7 मॅच
इंग्लंड दौऱ्यात टीम इंडिया 7 मॅच खेळणार आहे. यामध्ये 1 टेस्ट, 3 टी-20 आणि 3 वनडे मॅचचा समावेश असणार आहे. 1 जुलैपासून टेस्ट मॅच सुरू होणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचे काही खेळाडू इंग्लंडला रवाना झाले. टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सीरिज खेळत आहे. यामध्ये 3 सामन्यांमध्ये भारताने एक मॅच जिंकली आहे.

हे पण वाचा :
आता भाजपचे पुढचे मिशन लोकसभा; देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती

देहूतील कार्यक्रमाबाबत अजितदादा प्रथमच बोलले; म्हणाले की मला…

Multibagger Stock : दीर्घकालावधीत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!

अजित पवारांनी स्वीकारले देवेंद्र फडणवीसांचे आव्हान ; म्हणाले कि…

अखेर केतकी चितळेला जामीन मंजूर

Leave a Comment