हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेमध्ये असेही एक चर्च आहे जिथे देवाला प्रार्थना करण्याचा मार्ग हा इतर ठिकाणांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. या चर्चवर विश्वास ठेवणारे लोक आपल्या आवडीचे मद्य आपल्यासोबत आणतात आणि प्रार्थना म्हणून मद्यपान केले जाते. गबोला चर्चमध्ये लोक प्रार्थनेच्या नावाखाली आवडीचे मद्य पितात आणि देवाची आठवण करतात.
जगातील अशा प्रकारचा हा एकच चर्च आहे जेथे प्रार्थनेदरम्यान मद्यपान करण्यास परवानगी आहे. या चर्चमध्ये आवडीची दारू पिणे हा प्रार्थनेचा एक भागच मानला जातो.
AFP च्या वृत्तानुसार हे चर्च दक्षिण आफ्रिकेतील टाव्हरेन शहरात आहे. हे शहर दक्षिण आफ्रिकेची राजधानी जोहान्सबर्गपासून सुमारे 50 किमी दक्षिणेस आहे.
या चर्चची स्थापना वर्ष 2017 मध्ये 54 वर्षीय ट्रेस्टी माकीतीने केली होती. त्यांचा असा विश्वास आहे की, चर्चच्या युरोपियन संस्कृतीला नाकारणे आवश्यक आहे आणि आपण आपल्याला प्रार्थनेमध्ये अशा काहीतरी गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजे ज्यामुळे आपला समाज जवळ आला आहे.
मकितीच्या मते, लोक पबमध्ये जाऊन मद्यपान करतात आणि आनंदी असतात, मन हलके करतात. आता ते या चर्चमध्ये देखील असे करू शकतात, लोक देवाची भक्तीही करतील आणि चर्चमध्ये त्यांचा वेळही वाया घालवणार नाहीत.
मकितीच्या मते, येशू शिकवले आहे की समुद्रात जाळे अशा ठिकाणी लावले पाहिजे की जिथून मासे पकडले जाण्याची शक्यता आहे. मी तेच करत आहे. माझ्या चर्चमध्ये बरेच लोक येतात ज्यांनी आता इतर चर्चमध्ये जाणे बंद केले आहे.
मकिती असेही मानतो की, जास्त मद्यपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. ते म्हणतात की लोक येथे फक्त मद्यपान करायला येत नाहीत, ते कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रार्थनेत सामील होतात. हा आपला मार्ग आहे, आणि आम्हाला तो आवडतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.