कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये चोरीची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कपड्यांच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या महिलांनी कपड्याच्या आडूनच चोरी (stolen cloths) केली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कपडे चोरणाऱ्या (stolen cloths) या महिलांची टोळीने नवा कोऱ्या कपड्यांवर डल्ला मारत हजारो रुपयांचा माल लंपास केला आहे. या महिला सध्या फरार आहेत.
कपड्यांच्या आडून कपड्यांचीच चोरी! कपडेचोर महिलांचा प्रताप CCTV कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/3rCRsfEqvY
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 14, 2022
पोलिसांकडून या कपडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीचा शोध घेण्यात येत आहे. दुकानदाराला बोलण्यात काही महिला गुंतवून ठेवायच्या आणि तोपर्यंत इतर महिला कपड्यांच्या दुकानातील मालावर हात साफ करायच्या.कपड्यांच्या आडूनच कपड्यांची चोरी करण्याचा हा प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कल्याणमध्ये समोर आलेल्या या चोरीच्या घटनेमुळे कपडे विक्री करणारे दुकानदारही धास्तावले आहेत.
नेमकी चोरी कुठं केली?
कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात केशाज लेडीज गारमेंट नावाचं दुकान आहे. या दुकानात 6 मे रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास काही महिला आणि पुरुष अशी चोरट्यांची टोळी आली. यापैकी काही महिलांनी दुकानातील कर्मचारी भूपेंद्र चावडा यांना कपडे दाखवण्यात गुंग ठेवलं आणि इतर महिलांनी रॅकमधले कपड्याचे बंडल (stolen cloths) चोरले. काही दिवसांनी कपड्यांचा स्टॉक कमी आढळल्याने दुकानाची मालकीण पूजा गुप्ता यांनी सीसीटीव्ही तपासले असता हा सगळा प्रकार समोर आला. त्यानुसार दुकानाच्या मालकीण पूजा गुप्ता यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसांनी आयपीसी 380, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून या महिलांचा शोध सुरु केला आहे.
हे पण वाचा :
मुंबईचा ‘हा’ खेळाडू लवकरच भारताकडून खेळणार, कर्णधार रोहित शर्माने वर्तवले भविष्य
राज्यसभा निवडणूकीची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान
PM Shram Yogi Maandhan : ‘या’ योजनेद्वारे सरकारकडून मिळेल दरमहा 3,000 रुपये पेन्शन