मुंबई । राज्यात करोनाबाधितांची रुग्ण संख्या अद्यापही वाढतच आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत राज्यात 472 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आणखी ९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. आज नवीन रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या 4 हजार 676 वर पोहचली आहे. याबरोबरच आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 232 वर पोहचली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
472 more #COVID19 cases reported in Maharashtra till 10 am today, taking total positive cases in the state to 4676. 9 more deaths have been reported, taking the total death toll in the state to 232: Public Health of Department, Government of Maharashtra pic.twitter.com/bMe12H3MeG
— ANI (@ANI) April 21, 2020
दुसरीकडे देशभरातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. मागील २४ तासांत देशभरात कोरोनाने 47 जणांचा बळी घेतला असून, 1 हजार 336 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर देशातील एकूण कोरोनाची रुग्ण संख्या 18 हजार 336 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 14 हजार 759, रुग्णालायतून उपचारानंतर घरी पाठण्यात आलेले 3 हजार 252 व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 590 जणांचा समावेश आहे.
47 deaths and 1336 new cases reported in last 24 hours. India’s total number of #Coronavirus positive cases rises to 18,601 (including 14759 active cases, 3252 cured/discharged/migrated and 590 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/ZYumpbPvna
— ANI (@ANI) April 21, 2020
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”.