आदित्य ठाकरेंना धमकीचा फोन; फडणवीसांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार सुनील प्रभू यांनी दाभोलकर, पानसरे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कर्नाटकातील आरोपी होते, असे म्हंटले. यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या मागण्या केल्या. हत्यांचे प्रकरण महाराष्ट्रातील असो किंवा कर्नाटकातील असो जे गुन्हेगार हे गुन्हेगार असतात. ठाकरे यांच्या धमकीबाबत आणि सनातन संस्थेबाबत पुरावे असतील तर या प्रकरणाची राज्य सरकारने कसून चौकशी करावी. आदित्य ठाकरेंना धमकीचा फोन येणे हि गंभीर गोष्ट आहे, या प्रकरणी पुरावे असतील तर केंद्राकडे द्यावेत, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

अधिवेशनात राजकीय नेत्यांना धमकीवरून चर्चा करण्यात आली. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. ते म्हणाले की, सनातन संस्था असल्याने त्याची या सरकारला अडचण वाटत आहे. दोन वर्षांपासून यांचेच सरकार आहे.

 

मग इतकी दिवस का अशा संस्थांवर का कारवाई केली नाही? पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हि घटना अत्यन्त वाईट आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्या संदर्भात 2012 साली भुजबळांचे सकते असताना प्रस्थाव आला. मात्र, तो केंद्राकडे पाठविण्यात आले नाही. आम्ही पाच वर्षे होतो. आम्ही पाठवू शकलो नाही.

विधानसभा हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण

तुमचे आता दोन वर्षे झाले सरकार आहे तुमच्याकडे पुरावे असतील तर या संदर्भात तक्रार दाखल करावे. आदित्या ठाकरे यांना धमकीचा फोन येत असेल तर ती गंभीर बाबा आहे. या संदर्भात कर्नाटक सरकारची मदत लागणार असेल तर मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन तेथील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, असेही फडणवीस यांनी म्हंटले.

शक्ती कायद्यावर विधानसभेत चर्चा

काय आहे प्रकरण?

बंगळुरुहून अटक करण्यात आलेला आरोपी जयसिंग राजपूत याने 8 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 च्या सुमारास सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवला होता. त्या मेसेजमध्ये त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले होते. त्यानंतर त्याने तीन फोनही केले. आदित्य ठाकरेंनी ते फोन उचलले होते. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

Leave a Comment