हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपणास घरात राहूनच पैसे कमवायचे असतील तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. जर आपण दरमहा चांगले उत्पन्न मिळवण्याचा विचार करत असाल तर आपण एसबीआय एन्युटी डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक करून आपण दरमहा एक निश्चित उत्पन्न मिळवत रहाल. या योजनेद्वारे आपण दरमहा चांगले उत्पन्न देखील मिळवू शकता. जर या योजनेत कोणताही ग्राहक पैसे गुंतवत असेल तर दरमहा त्याला एक फिक्स्ड इनकम मिळते. एसबीआयच्या या योजनेत मासिक एन्युटीसाठी किमान एक हजार रुपये जमा करता येऊ शकतात. तसेच या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूकीला कोणतीही मर्यादा नाही आहे.
किती रक्कम जमा करता येईल
जर तुम्हाला 60 वर्षांसाठी दरमहा 5,000 रुपये मासिक उत्पन्न हवे असेल तर बँक तुम्हाला किती रक्कम जमा करायची हे सांगेल.पण डिपॉझिटची रक्कम 25,000 पेक्षा कमी नसावी. मात्र , त्याची कमाल मर्यादा सेट केलेली नाही. ही डिपॉझिट स्कीम 36/60/84 किंवा 120 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. आपले मासिक इनकम जमा केलेल्या कालावधी आणि मूळ पैशांच्यावर अवलंबून असेल.
मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा
या योजनेत नॉमिनेशनची सुविधा देखील उपलब्ध आहे. एन्युटीमध्ये जमा केलेल्या रकमेच्या 75% इतकी रक्कम ठेवीदारा ओव्हरड्राफ्ट आणि लोनची सुविधा घेऊ शकतात. दुसरीकडे, जर आपण मॅच्युरिटीच्या कालावधीबद्दल बोललो तर आपण त्यामध्ये 3 वर्षे, 5 वर्षे, 7 वर्षे आणि 10 वर्षे प्रमाणे गुंतवणूक करू शकता.
बँकेच्या वेबसाइटनुसार, एसबीआय एन्युटी डिपॉझिट योजनेच्या मुदतीपूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास नॉमिनी व्यक्तीला पैसे काढण्याची परवानगी आहे. या योजनेचा लाभ कोणीही घेऊ शकेल. यामध्ये वैयक्तिक किंवा जॉईंट खाती, प्रौढ आणि अल्पवयीन मुले देखील घेऊ शकतात. या योजनेला बँकेच्या दुसर्या शाखेत अकाउंट ट्रांसफर तसेच एफडी नियमांवर आधारित टीडीएसचे नियम असतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.