आता LED/LCD टेलिव्हिजन खरेदी करणे होणार महाग! सरकारचा नवीन आदेश आजपासून आला आहे अंमलात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । आपण जर कलर टेलिव्हिजन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर हे जाणून घ्या आज 1 ऑक्टोबरपासून एलईडी / एलसीडी टीव्हीच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या महत्त्वपूर्ण घटकावर 5 टक्के सीमाशुल्क लागू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे टेलिव्हिजनच्या किंमती वाढण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने 30 सप्टेंबरपासून ओपन सेल (Open Cell) च्या आयातीवरील 5 टक्के कस्टम ड्युटीची सवलत काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. LED TV मध्ये ओपन सेल पिक्चर ट्यूबसारखे काम करते जे भारतात तयार होत नाही. टीव्ही निर्माते ओपन सेल आयात करतात, ज्यावर आतापर्यन्त कोणताही कर आकारला जात नव्हता. परंतु 1 ऑक्टोबर पासून सरकार ओपन सेलच्या आयातीवर 5 टक्के शुल्क आकारणार आहे.

कलर टेलीव्हिजनसाठी ओपन सेल हा सर्वात महत्वाचा भाग आहे. त्याच वेळी, ओपन सेलच्या आयातीवर शुल्क लागू केल्याने भारतातील टेलीव्हिजन (TV) च्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

किती महाग होईल TV ?
सरकारच्या या निर्णयामुळे टीव्हीची किंमत 600 ते 1500 रुपयांनी वाढू शकते. परंतु सरकारचे असे म्हणणे आहे की, या निर्णयाचा परिणाम केवळ 150-250 रुपये इतकाच होईल. देशात Manufacturing वाढावे म्हणूनच सरकारने Duty वर सवलत आणि TV Sets च्या आयातीवर बंदी घातली होती. मागील वर्षी, 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कस्टम ड्युटी वरून ओपन सेलच्या आयातीस सूट दिली होती. सरकारने यावेळी देशांतर्गत उद्योगांना आपली उत्पादन क्षमता वाढविण्यास सांगितले होते.

अर्थ मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की ,एलईडी / एलसीडी टीव्ही पॅनेलसाठी ओपन सेलवर 5 टक्के कस्टम ड्युटी लावण्याची तरतूद लागू करण्यात आली आहे. मागील वर्षापर्यंत 7,000 कोटी रुपयांचे टेलिव्हिजन आयात केले होते. या वर्षाच्या जुलै अखेरपासून टेलिव्हिजन आयात प्रतिबंधित प्रकारात ठेवली गेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.