जगातील सर्वात पहिलं Kiss कुणी केलं?, कुठून झाली नक्की सुरुवात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेम व्यक्त करताना कधी भान विसरून दोन प्रेमिक एकमेकांचे चुंबन घेतात. एकमेकांना घट्ट मिठीत घेऊन किस करतात. तसे पाहिले तर प्रेम व्यक्त करण्याचे ते एक प्रकारचे माध्यमच आहे. जगात सर्वात प्रथम पहिलं किस कुणी केली. कोणत्या ठिकाणी किस करण्याचाही पहिल्यादा घटना घडली? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामागचे नक्की कारण काय? हे आपण जाणून घेऊयात…

आजच्या काळात एखाद्या व्यक्तीने चुंबन घेणे ही जणू प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बनली आहे. विशेषत: ओठांवर चुंबन घेणे हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. जगात सर्वात पहिले चुंबनची सुरुवात फ्रेंच जोडप्यापासून झाली असावी, असे म्हटले जाते. तर किसची सुरुवात भारतातून सुरू झाली आणि त्यानंतर हे जगभर पसरले, असे मत तज्ज्ञांतून व्यक्त केले जात आहे.

जगातील सर्वात अगोदर पहिलं Kiss कुणी केलं?

तज्ञांच्या मते सर्वात प्रथम किस करण्याची पद्धत ही प्राण्यापासून आलेली असावी, यापासूनच मानवामध्ये चुंबन प्रचलित झाले असावे, असे काहीचे मत आहे. चिंपांझी प्राणी असेच करतात. चिंपांझी आपल्या मुलांना त्यांचा सांभाळताना त्यांचे चुंबन घेतात. त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांकडून मानव चुंबन घेण्यास शिकलो, असे काही तज्ज्ञांतुन मत व्यक्त केले जात आहे.

किस करण्याला सुरुवात कशी झाली?

लहान मुलांची गालाची पप्पी, चुंबन घेणे हे सर्वचजण करत असतात. मात्र, ज्यावेळी आपण आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीची (प्रेमिक अथवा प्रेयसीचा) किस घेतो तेव्हा त्यामागील अनेक कारणे असतात. वास्तविक किस करायला सुरुवात कशी आणि कुठून झाली असावी याबद्दल शास्त्रज्ञांकडून वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले आहेत. जगातील सर्वात पहिलं चुंबन (Kiss) एक अपघात झाला असावा. हा अपघात लोकांना आवडला आणि त्यानंतर किस घेणे प्रचलित झाले, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

आणखी एक महत्वाचे कारण?

काही शास्त्रज्ञांनी किसबाबत महत्वाचे सिद्धांत मांडले आहेत. चुंबन हा प्रकार अपघातामुळे झाला असावा. टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या मानववंश शास्त्र विभागाने यावर संशोधन केले आहे. संशोधनानुसार, मानव एकमेकांच्या जवळ जाऊन वास घेण्याचा प्रयत्न करत असताना अपघाताने त्यांनी एकमेकांचे चुंबन घेतले असावे, असा दावा करण्यात आला आहे. किस करण्याचे अनेक प्रकार आहेत. यातील फ्रेंच किस सर्वात प्रचलित आहे. फ्रेंच लोकांनी याची सुरुवात केल्याचा दावा केला जात आहे.

Kiss करण्याचे ‘हे’ आहेत फायदे

  • आपण किस केल्याने तणाव दूर होन्यास मदत होते तसेच आराम मिळतो. मेंदूवरील ताण खूप कमी होतो. विशेष म्हणजे किसिंगमुळे तुमच्या मेंदूमधील सेस्क फिलिंगला चालना मिळते . त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चकाकी येते.
  • किस केल्यावर चेहऱ्याला जास्त तजेलदारपणा येतो. आपल्या चेहऱ्यावरील मांसपेशी आणि 112 पोश्चर स्नायू किस केल्याने अॅक्टीव होतात. किस केल्याने आपल्या चेहऱ्याचाही व्यायाम होतो. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकूत्या येत नाही.
  • जास्त घट्टपणे किस केल्याने शरिरातील ऑर्बिक्युलरिस ओरिस स्नायू ओठांना किस करण्यासाठी अॅक्टिव्ह करतो. किसींगमुळे प्रतिकारशक्ती वाढते. असंवेदनशील व्यक्तीला संवेदनशील करते. किस केल्याने आणखी तरूण, बळकट आणि अधिक आनंदी दिसण्यास मदत होते.