LIC IPO : 12 मे रोजी अलॉट होणार शेयर, 17 मे ला BSE-NSE वर लिस्टिंग; जाणून घ्या महत्वाचे अपडेट्स

LIC IPO Price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी विमा कंपनी LIC चा IPO सोमवारी बंद झाला. IPO बंद झाल्यानंतर, LIC IPO चे शेअर्स 12 मे रोजी वाटप केले जातील आणि ते 17 मे रोजी BSE-NSE वर सूचीबद्ध होतील अशी माहिती DIPAM चे सचिव तुहिन कांत पांडे यांनी दिली आहे.

LIC IPO ला सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत हा IPO जवळपास 3 वेळा सबस्क्राइब झाला होता. देशातील सर्वात मोठा IPO ठरलेल्या ‘LIC IPO’ पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक सदस्यता घेतली आहे. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी LIC IPO यशस्वी केलाय अन हेच आत्मनिर्भर भारताचे उदाहरण आहे असे पांडे यांनी म्हटले आहे.

हाती आलेल्या आकडेवारीनुसार, IPO मध्ये 16,20,78,067 शेअर्स ऑफर करण्यात आले होते आणि त्यासाठी 47,83,25,760 बोली प्राप्त झाल्या होत्या. पॉलिसीधारकांच्या श्रेणीमध्ये IPO 6.12 पट सबस्क्राइब झाला. त्याचप्रमाणे, एलआयसी कर्मचार्‍यांसाठी राखीव भाग 4.4 पट सबस्क्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा देखील 1.99 पट सबस्क्राइब झाला. या व्यतिरिक्त, QIB साठी राखून ठेवलेला भाग 2.83 वेळा आणि NII भाग 2.91 वेळा सदस्य झाला. एकूणच, LIC IPO ला २.९५ पट सबस्क्रिप्शन मिळाले.

हा आयपीओ यशस्वी करण्यासाठी सरकारने वीकेंडलाही खुला ठेवला होता. वीकेंडलाही आयपीओ बोलीसाठी खुला राहण्याची हि पहिलीच वेळ ठरली. LIC चा IPO 4 ते 9 मे पर्यंत सामान्य गुंतवणूकदार आणि संस्थात्मक खरेदीदारांसाठी खुला होता. शनिवार आणि रविवारीही IPO सुरू असल्याने, गुंतवणूकदारांना त्यांच्या बोली लावण्यासाठी 6 पूर्ण दिवस मिळाले. LIC IPO पहिल्या 2 दिवसातच पूर्णपणे भरला गेला. वीकेंडच्या 2 दिवसांत 41 टक्के सबस्क्राइब झाले.

महत्वाच्या बातम्या –

iPhone 14 Release Date : धुरळा उडवायला येतोय Apple चा iPhone 14!, काय असेल किंमत? लाँचिंग डेट आणि सर्वकाही जाणून घ्या

ना हातात बॅट पकडली ना बॉल, तरी बदललं ‘या’ व्यक्तीचे नशीब,3 तासांत कमावले 2 कोटी!

वार्‍यामुळे पूल पडला? IAS अधिकार्‍याचं उत्तर ऐकुण नितिन गडकरी झाले हैराण

Vi Prepaid Plan : फक्त 82 रुपयांमध्ये Vi युझर्सना पाहता येणार अनलिमिटेड वेबसीरीज-मुव्हीज

PM Kisan : शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळण्यास होतो आहे उशीर, यामागील कारण तपासा