Friday, June 2, 2023

LIC IPO: जर तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर आधी कंपनीविषयीची जाणून घ्या

नवी दिल्ली । LIC ने शेअर बाजारात आपला IPO लॉन्च करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. बाजार नियामक सेबीनेही रविवारी ड्राफ्ट पेपर जमा केली. आता बाजाराबरोबरच गुंतवणूकदारही IPO उघडण्याची वाट पाहत आहेत.

अशा परिस्थितीत यात असे काय विशेष आहे की, या IPO ची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खरं तर, कंपनीने खुलासा केला आहे की, सप्टेंबर 2021 मध्ये तिची एसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) 39.6 लाख कोटी रुपये होती. तेव्हापासून गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढली आहे. याशिवाय कंपनीबद्दल अशा काही गोष्टी आहेत, ज्या IPO खरेदी करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी समजून घेतल्या पाहिजेत.

LIC ही देशातील सर्वात मोठी लिस्टेड कंपनी असेल
लंडनस्थित ब्रँड फायनान्सच्या मते, LIC ची मार्केटकॅप यावर्षी 43 लाख कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. 2027 पर्यंत ते 58.9 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. अशा प्रकारे, पुढील अनेक वर्षे ही देशातील सर्वात मोठी कंपनी राहील. सध्या सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, ज्याचे मूल्यांकन सुमारे 16 लाख कोटी रुपये आहे.

न्यू बिझनेस प्रीमियम ग्रोथ देखील उत्तम
2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत LIC चा करानंतरचा नफा 1,437 कोटी रुपये होता. वर्षभरापूर्वी याच काळात ते 6.14 कोटी रुपये होते. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, LIC च्या नवीन व्यवसाय प्रीमियमचा वाढीचा दर 554.1 टक्के होता. 522 अब्ज डॉलर्सच्या एकूण मालमत्तेच्या बाबतीत ही जगातील सहावी सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी आहे.

मालकी सरकारकडेच राहील
सध्या LIC ची मालकी सरकारकडे आहे. त्यातील 5 टक्के हिस्सेदारी विकली तरी सरकार त्याचे मालक राहणार आहे. कायद्यानुसार LIC मध्ये सरकारची हिस्सेदारी 51 टक्क्यांपेक्षा कमी असू शकणार नाही. याशिवाय, सरकार 5 वर्षांमध्ये LIC मधील 25 टक्क्यांहून अधिकचे स्टेक विकू शकत नाही.

LIC चा मार्केट शेअर आणि रिटर्न ऑन इक्विटी मजबूत
इन्शुरन्स मार्केट मध्ये LIC चा एकूण हिस्सा 64.1% आहे. त्याचा रिटर्न ऑन इक्विटीही सर्वाधिक 82 टक्के आहे. लाइफ इन्शुरन्स प्रीमियम्सच्या बाबतीत ही जगातील तिसरी सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी आहे. चीनी विमा कंपनी पिंगचा रिटर्न ऑन इक्विटी 19.5 टक्के आहे, तर अविवाचा 14.8 टक्के आहे. चायना लाइफ इन्शुरन्सचा रिटर्न ऑन इक्विटी 11.9 टक्के आहे.