Saturday, February 4, 2023

राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट; मुंबईतील बॅनरने चर्चेला उधाण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक बॅनर ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईतील घाटकोपर येथे राज ठाकरेंचा भलामोठा बॅनर उभा करत त्यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा केला आहे. विशेष म्हणजे हिंदुहृदयसम्राट हे फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनाच म्हंटल जात होतं. त्यामुळे राज ठाकरेंच्या या बॅनर वरून शिवसेना काय प्रत्युत्तर देते हे सुद्धा पाहावं लागेल.

आज घाटकोपर मध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालय चे उद्घाटन आहे.यासाठी राज ठाकरे यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर्स मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात लावले आहेत.यात राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदू हृदय सम्राट लावण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना मनसेची वाटचाल हिंदुत्वकडे दिसत आहे.

- Advertisement -

यापूर्वी राज ठाकरे यांना मराठी हृदयसम्राट म्हंटल जात होतं. तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट म्हणत होते. राज ठाकरे यांची देहबोली आणि भाषणशैली हुबेहूब बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखी च आहे. पण मनसे कडून राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा केल्यानंतर शिवसेने कडून काय प्रतिक्रिया येते हे पाहायला हवे.