मुंबई प्रतिनिधी |कर्नाटकचे राजकीय कर-नाटक थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता मुंबईमध्ये असणाऱ्या आमदारांनी पोलिसांना आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र दिले आहे. ‘काँग्रेस नेते डे.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पासून आमच्या जीवाला धोका आहे असे त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
मुंबई स्थिती एका बड्या हॉटेलमध्ये राजीनामा सादर केलेले आमदार येऊन राहिले आहेत. आमचे राजीनामे स्वीकारल्या शिवाय आम्ही कर्नाटकाला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्याच प्रमाणे या नाराज आमदारांना समजवण्यासाठी काँग्रेस नेते डे.के शिवकुमार हे देखील मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या पासूनच आमच्या जीवाला धोका असल्याचे या आमदारांनी पोलिसांना सांगितल्याने आता राजकीय पेच अधीकच गडद झाला आहे.
राजकीय कर-नाटक मधील नवीन अध्याय हा की बंडखोर आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्याच हॉटेलमध्ये काँग्रेस नेते शिवकुमार राहण्यास आले आहेत. आता त्यांना त्यांच्या हॉटेलच्या रूममध्ये जाऊ दिले जात नाही. पोलीसांनी त्यांना हॉटेल बाहेरच रोखून धरले आहे. तसेच त्यांना बंडखोर आमदारांची इच्छा असल्या शिवाय आत पाठवले जाणार नाही अशी माहिती देखील समोर आली आहे.
‘या’ कारणांमुळे भारतीय संघ विश्वचषकातून पडला बाहेर
विश्वचषकातून भारत बाहेर ; सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सोळाजण इच्छूक
काँग्रेस नेत्यांकडून आमच्या जीवाला धोका ; आमदारांचे पोलिसांना पत्र
राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी काँग्रेसने आणला नवीन फॉर्मुला