सोलापूर । फटाक्याच्या ट्रकवर आज पहाटे भर पावसात वीज कोसळून मोठा अपघात झाला. त्यामुळे फटाक्यांच्या स्फोटाने ट्रक भस्मसात झाला. ही घटना सोलापूर पुणे हायवेवर वरवडे टोल नाका परिसरात आज पहाटे घडली.
फटाक्याने भरलेला ट्रक पुणे कडून सोलापूर कडे जात असताना चालत्या ट्रकवर वीज पडली. यामुळे ट्रक मधील फटाके पेटले आणि एका मागोमाग एक फटाक्यांचे स्फोट होऊ लागल्याने पडत्या पावसात ट्रक पेटला. चालकाने सावधानता बाळगत ट्रक सोडल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र अल्पावधीतच ट्रक पूर्णपणे जळून राख झाला.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1217195085693170
या अग्नितांडवामुळे दोन्ही बाजूनी वाहतूक दोन तास थांबली होती. अग्निशमन यंत्रणा, पोलीस, पथके वेळेत दाखल झाली आणि आग विझवल्यावर हायवेच्या वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
फटाक्यांची आतषबाजी नाही तर स्फोट
या अपघाताचे व्हिडीओ पाहून अनेकांना हि फटाक्यांची आतषबाजी वाटत आहे. मात्र हि फटाक्यांची आतषबाजी नसून पुणे सोलापूर महामार्गावर झालेला स्फोट आहे. सध्या आयपीएल फिवर असल्याने रात्रीचे अनेकदा फटाके वाजताना दिसत आहेत. मात्र फटाक्यांनी भरलेल्या ट्रकवर वीज पडून झालेल्या अपघातात तर्क जाळून राख झाला आहे. तर तर्क मधील फटाके अनेकी वेळ फूटत होते. फटाक्यांचा स्फोट थांबेपर्यंत सर्व वाहतूक रोखण्यात आली होती.
वाहतूक सुरळीत चालू
आज पहाटे झालेल्या या अपघातांनंतर पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक बराच वेळ बंद ठेवण्यात आली होती. खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने स्फोट झालेल्या ट्रकच्या आजूबाजूला नागरिकांना थांबू दिले नव्हते. तसेच रस्त्यावरून जाणारी वाहने स्फोट सुरु असताना अडवल्याने वाहने खोळंबली होती. त्यानंतर सकाळी ६ च्या दरम्यान वाहतूक सुरळीत सुरु झाली.