हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यासाठी आता केंद्र सरकारने देशाचे तीनऐवजी पाच झोनमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता देशात रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन व्यतिरिक्त ‘बफर झोन आणि कंटेनमेंट झोन’चा समावेश करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकार या दोन नवीन झोनबाबत लवकरच निर्णय घेतील, याबाबतच्या गाईडलाईन्स अद्यापही जाहीर केलेल्या नाहीत. कोरोना विषाणूची लागण होणा-या लोकांची संख्या,कोविड -१९ प्रकरणांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रति लाख लोकसंख्येवर कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या यावर ‘रेड’, ‘ऑरेंज ‘ किंवा ‘ग्रीन’ झोन म्हणून घोषित करण्याचा निकष केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी काढला.
या निकषांनुसार, सोमवारपासून सुरू होणार्या लॉकडाउन ४.० दरम्यान सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश त्यांचे झोन हे या तीन झोनमध्ये विभाजित करू शकतील. मंत्रालयाने कुठल्याही ठिकाणी ‘कंटेनमेंट झोन’ किंवा ‘बफर झोन’ म्हणून घोषित करण्यासाठी काही निकष लावले आहेत आणि त्या भागात पसरलेल्या संसर्गाची साखळी मोडण्यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात हेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
बफर आणि कंटेनमेंट झोन
राज्य सचिव आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविलेल्या पत्रात आरोग्य सेक्रेटरी प्रीती सुदान म्हणाल्या की,’ राज्ये जिल्हा किंवा महानगरपालिका क्षेत्रांचे वर्गीकरण हॉट-स्पॉट्स,’रेड’, ‘ऑरेंज ‘ किंवा ‘ग्रीन झोन’मध्ये करू शकतात. म्हणजेच या तीन झोनबाबत राज्य सरकार निर्णय घेतील, तर जिल्हा प्रशासन कंटेनमेंट झोन आणि बफर झोन ठरवतील. कंटेनमेंट आणि बफर झोनमध्ये गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. गृह मंत्रालयाने अद्याप बफर झोन संदर्भात गाईडलाईन्स जाहीर केलेले नाहीत, परंतु कंटेनमेंट झोनबाबत गृह मंत्रालयाची गाईडलाईन्स अगदी स्पष्ट आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ अनिवार्य सेवा सुरु राहतील. कंटेनमेंट झोनमध्ये प्रवेश करण्यासही बंदी असेल. या झोनमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि डोर-टू-डोर हेल्थ स्क्रीनिंगही केले जाईल.
मंत्रालयाने राज्य सरकारांना सूचना दिल्या आहेत की झोनचे विभाजन करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत-
एकूण वैद्यकीय केसेस (राज्यात किती रुग्णांवर उपचार सुरू आहेत).
प्रति लाख लोकसंख्येत संक्रमित लोकांची संख्या.
७ दिवसानुसार संक्रमित लोकांच्या संख्येच्या दुप्पट वाढीसाठी सरासरी लागणारा वेळ.
सांसर्गिक मृत्यूचा दर.
प्रति लाख लोकसंख्येच्या तपासणीचा दर.
किती लोकांना सकारात्मक अहवाल प्राप्त होत आहे त्याचा दर लक्षात ठेवला पाहिजे.
लॉकडाउन ४.० मध्ये केंद्र सरकारने यावेळी राज्य सरकारांना बरेच अधिकार दिले आहेत. मात्र , लॉकडाऊन ४.० दरम्यान मेट्रो तसेच विमानाच्या वाहतुकीस परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ३१ मेपर्यंत मेट्रो चालविण्यावर तसेच देशी-विदेशी प्रवासी विमान उड्डाणांवर पूर्ण बंदी असेल. देशांतर्गत वैद्यकीय सेवा, घरगुती हवाई रुग्णवाहिका व सुरक्षा व्यवस्थेसाठी उड्डाणांना परवानगी देण्यात येईल. देशामध्ये कोरोना संक्रमणाची संख्या ही ९६ हजारांच्या पुढे गेलेली आहे तसेच या विषाणूमुळे तीन हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.