पुणे प्रतिनिधी |संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट होताना दिसते आहे. कारण मावळ मधून पार्थ पवार निर्णायक पिछाडीवर जाताना दिसत आहेत. तर शिवसेनेचे श्रीरंग बारणे मोठ्या मताधिक्याने विजयाकडे कूच करत आहेत.
माढा : चौथ्या फेरी अंती अशी आहे स्थिती
मावळ मध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी ९९ हाजारांची आघाडी घेतली असून पार्थ पवार पराभवाच्या गडद छायेत आहेत. पार्थ पवार यांनी श्रीरंग बारणे यांना चांगलीच लढत दिली. पार्थ पवार हे अजित पवारांचे पुत्र असल्याने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मावळमध्ये प्रचारासाठी हाजेरी लावली होती. मात्र मावळमध्ये जनता राष्ट्रवादीच्या मागे गेली नाही असे चित्र सध्याच्या मतांच्या पिछाडीवरून दिसते आहे.
टपाली मतदानात अशोक चव्हाणांना १ हजार मतांची आघाडी