नवी दिल्ली। ”देशाला प्रेरणा देण्याचं काम गावातील जनतेनं केलं आहे. सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाउन अशा मोठ्या शब्दांचा प्रयोग न करता ‘दो गज दूरी’ असा शब्द वापरून गावातील जनतेनं कोरोनाचा सामना केला. अशा प्रकारांवरूनच इतरत्र कोरोनाचा भारतानं कसा सामना केला याची चर्चा होत आहे. भारताचा नागरिक कठीण परिस्थितीत त्याच्या समोर झुकण्यापेक्षा त्याचा सामना करत आहे,” असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. पंचायत राज दिनानिमित्त त्यांनी देशातील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘ई ग्राम स्वराज’ या वेबपोर्टलचं अनावरण करण्यात आलं.
”जरी गावातील लोकांनी मोठ्या विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं नसेल पण संस्कार, परंपरेच्या शिक्षणाच दर्शन घडवले. गावातून येणारी माहिती अनेक विद्वानांना प्रेरणा देणारी आहे” असे मोदी म्हणाले. “गावातील प्रत्येक नागरिकाने, माता-भगिनीने, शेतकऱ्यांनी देशाला प्रेरणा देणारे काम केले आहे. देशातील प्रत्येक गावाला, तिथे रहाणाऱ्या जनतेला मी नमस्कार करतो. जगाला तुम्ही सरळ शब्दात मंत्र दिला आहे. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात हा मंत्र उपयोगात येईल. सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊन अशा मोठया शब्दांचा प्रयोग केला नाही. पण दो गज दूरी म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग या मंत्राच्या आधारावर अदभूत कार्य करुन दाखवले आहे ”असे मोदी म्हणाले.
“कोरोनानं आपल्याला स्वावलंबी बनण्यास शिकवलं. स्वावलंबी बनल्याशिवाय कोणत्याही संकटाचा सामना करणं अशक्य आहे. गाव, जिल्हे, राज्य, देश हे या निमित्तानं आपापल्या स्तरावर स्वावलंबी बनले. यापुढे आपल्याला कोणत्याही गोष्टींसाठी बाहेरच्या कोणावरही अवलंबून राहावं लागू नये इतकं स्वावलंबी राहावं लागेल. सशक्त पंचायत हे स्वावलंबनाचं उदाहरण आहे,” असंही मोदी यावेळी म्हणाले. आता गावांचं मॅपिंग हे ड्रोनच्या मदतीनं केलं जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. सुरूवातीला ६ राज्यांमध्ये याची सुरूवात केली जाणार असून टप्प्याटप्प्यानं अन्य राज्यातील गावांमध्येही याचा उपयोग केला जाणार असल्याचे ते म्हणाले.
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.