हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घातल्याने मुस्लिम मुलीला प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली. यावरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. या मुद्द्यावरून भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केले. “महिलांचे काही पोशाख पुरुषांना उत्तेजित करतात, म्हणून बलात्काराच्या घटना घडतात, असे विधान कर्नाटकचे भाजपा आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी केले.
कर्नाटकमध्ये हिजाबवरून वाद सुरू असताना भाजपा आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “बिकिनीसारखे शब्द वापरणे हे वाईट विधान आहे. कॉलेजमध्ये शिकताना मुलांनी पूर्ण कपडे घालावेत. आजकाल महिलांच्या कपड्यांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढत आहे कारण पुरुष भडकतात. हे योग्य नाही. आपल्या देशात महिलांचा सन्मान केला जातो. कन्नड भाषेत त्यांनी हे वक्तव्य केले.
सुरुवातीला त्यांनी केलेल्या विधानामुळे वाद होणार असल्याचे त्यांच्या नंतर लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली. प्रियांकाने माफी मागावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.