‘शोले’ च्या ‘ठाकूर’ च्या मिमिक्रीसाठी प्रसिद्ध असलेले माधव मोगे यांचे निधन, कर्करोगाशी झुंज अखेर ठरली अपयशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । प्रसिद्ध मिमिक्री कलाकार माधव मोघे यांचे रविवारी 11 जुलै रोजी निधन झाले. मीडिया रिपोर्टनुसार, ते तिसऱ्या टप्प्यातील फुफ्फुसांच्या कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांनी ‘दामिनी’, ‘घातक’, ‘विनाशक’, आणि ‘पार्टनर’ या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. ‘शोले’ या क्लासिक चित्रपटाची मिमिक्री करून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळविली. त्यांनी टीव्हीवरील अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले. ते 68 वर्षांचे होते.

1993 मध्ये रिलीज झालेल्या ‘दामिनी’ या सुपरहिट चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात सनी देओल, ऋषी कपूर, अमरीश पुरी आणि मीनाक्षी शेषाद्री यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या मिमिक्री स्टाईलमुळे त्यांना ज्येष्ठ अभिनेते संजीव कुमार यांची कॉपी म्हटले गेले. ते उत्पल दत्त आणि राजकुमार यांचीही मिमिक्री करायचे. त्यांनी ‘शोले’ च्या ठाकूरची भूमिका ‘एमटीव्ही फुल्ली फाल्तु’ या शोमध्ये साकारली होती.

2011 मध्ये रिलीज झालेल्या ‘जान पहचान’ या सिनेमात ते शेवटचे पडद्यावर दिसले होते. यात सचिन पिळगावकर आणि रंजीता कौर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले. त्यांनी देश-विदेशात अनेक स्टेज शोज होस्ट केले आहे. गेल्या महिन्यात 21 जून रोजी माधव यांच्या पत्नीचेही निधन झाले. त्या किडनीशी संबंधित समस्येने ग्रस्त होत्या आणि डायलिसिसवर होत्या.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment