मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप युतीच्या फॉर्म्युल्यावर अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र सर्व तर्क वितर्क आता निकाली निघाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यात झालेल्या चर्चेत युतीचा फॉर्म्युला पक्का केला आहे. तो फॉर्म्युला घेऊन सुभाष देसाई मातोश्रीवर गेले असता उद्धव ठाकरे यांनी देखील त्या फॉर्म्युल्याला ग्रीन सिंग्नल दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुभाष देसाई यांच्यात झालेल्या चर्चेअंती काल रात्री युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. यात शिवसेनेला १२६ जागा तर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला १६२ जागा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय उद्धव ठाकरे यांना देखील मान्य झाला आहे. मात्र या बाबत अद्याप अधिकृत घोषणा केली गेली नाही. येत्या दोन दिवसात कोणत्या जागी कोणी लढायचे याचा निर्णय करून अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात युतीची घोषणा करायची असा मनसुबा दोन्ही पक्षांचा असावा असे राजकीय जाणकारांनी म्हणले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने माघार घेतली असून शिवसेना आपल्याविधानसभेतील जागा अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करत आहे असेच एकंदरीत चित्र आहे. परंतु सत्ता पदांच्या धबडग्यात शिवसेना आपला मराठी स्वाभिमान विसरत चालली आहे का असा सवाल जनसामान्यातून विचारला जात आहे.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group Link| http://bit.ly/308MQF6