युती झाल्यास मिळणार २०५ जागा ; तर स्वतंत्र लढल्यास भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून काल निवडणूक आयोगाने याची घोषणा केली आहे. २१ ऑक्टोंबर रोजी मतदान पार पडून २४ ऑक्टोंबरला विधानसभेचा निकाल लागणार आहे. मात्र निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात होण्याआधीच एका मराठी वृत्तवाहिनीने निवडणुकीचा निकाल कसा असेल याचा सर्व्हे प्रदर्शित केला आहे.

गटबाजी चव्हाट्यावर : शरद पवारांची सभा संपताच राष्ट्रवादीच्या दोन गटात तुफान हाणामारी

विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर झाल्यास राज्याच्या विधानसभेत भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल असा हा सर्व्हे सांगत आहे. विधानसभा निवडणुकीला भाजप युतीच्या माध्यमातून सामोरे गेला तर भाजप आणि महायुतीला २०५ जागी विजय मिळणार आहे. तर शिवसेना भाजपची युती तुटल्यास भाजप स्वतः १४४ जागी विजयी होऊन स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे असा सर्व्हेचा अंदाज आहे. त्याच प्रमाणे युती तोडल्यास शिवसेनेची प्रचंड हानी होणार असल्याचे या सर्व्हेतून स्पष्ट होत आहे. कारण युती तुटल्यास शिवसेना ६३ वरून ३९ वर घसरणार असल्याचे चित्र या सर्व्हेमधून समोर आले आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची स्थिती देखील या सर्व्हेत खूपच खराब होणार असल्याचे सांगितले आहे. काँग्रेस २१ जागी तर राष्ट्रवादी राष्ट्रवादी २० जागी विजयी होईल असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे.

गोपीचंद पडळकर पुन्हा भाजपच्या वाटेवर ; वंचितच्या अडचणी वाढल्या

यापुढे विरोधी पक्ष नेता काँग्रेस राष्ट्रवादीचा असणार नाही. तर तो वंचित बहुजन आघाडीचा असणार आहे असे भाकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी केले होते. त्यांच्या या भाकिताला धरूनच या सर्व्हेत वंचितची कामगिरी दर्शवण्यात आली आहे. वंचित आगामी निवडणुकीत ६४ जागी विजयी होण्याची शक्यता आहे असे भाकीत या सर्व्हेत करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपने देखील असाच एक सर्व्हे केला असावा त्या सर्व्हेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केले असावे असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. एकूणच महाराष्ट्र विधानसभेची येणारी निवडणूक याआधी झालेल्या निवडणुकीपेक्षा वेगळी निवडणूक असणार आहे हे मात्र नक्की त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय परिवर्तनाची निवडणूक म्हणून देखील बघितले जाते आहे.