आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात; राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे. एप्रिल महिन्यापासूनच ही वेतन कपात लागू होणार आहे. वर्षभरासाठी हा निर्णय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात या महिन्यापासून म्हणजे एप्रिल २०२० पासून पुढील वर्षीपर्यंत म्हणजे एप्रिल २०२१ पर्यंत ३० टक्के वेतन कपात करण्यात येणार आहे.

याआधी केंद्र सरकारने खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं केंद्र सरकार पाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. आमदारांच्या वेतन कपातीतून वाचणारा निधी करोनाचा सामना करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

दरम्यान, येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिन अगदी सध्या पद्धतीनं साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र दिनाला प्रत्येक जिल्ह्यात होणारे ध्वजारोहण हे केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी व निवडक मान्यवरांच्या उपस्थितीतच होईल. कुठलाही महोत्सव किंवा परेडचे आयोजन केलं जाणार नाही, असा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”