सुब्रमण्यम स्वामींचा उद्धव ठाकरेंना सल्ला, आघाडीतून बाहेर पडण्याची ‘हीच ती वेळ’ अन्यथा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाची महाराष्ट्रातील निवडणूक आणि विशेषतः निवडणूक निकालानंतरची मुख्यमंत्री पदाची निवड होईपर्यंतचा काळ चांगलाच गाजला आहे. अनेक चढ-उतारांनी या निवडणुकीने देशभरात चर्चेला कारण दिले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून रोज नव्याने त्यांच्यावरच्या टीका आणि त्यांना दिले जाणारे सल्ले चर्चेत येत असतात. याच चर्चांमध्ये भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी एक नवा मुद्दा दिला आहे. त्यांनी नुकताच एक लेख आपल्या ट्विटर अकाउंट वरून प्रसिद्ध करत राष्ट्रपती राजवट हा महाराष्ट्रासाठी एकमेव पर्याय आहे का? असे ट्विट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना युती तोडा अथवा राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुम्हाला संपवून टाकेल असा सल्ला त्यांनी दिला आहे.

देशाच्या एकूण कोरोना बाधितांपैकी ३३% रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत  २० टक्के  रुग्ण मुंबईत आहेत. अशी आकडेवारी देत स्वामी यांनी महाराष्ट्र सरकार या संकटकाळात उपाययोजना करण्यात, लोकांना वाचविण्यात अपयशी ठरले आहे असे आपल्या लेखात लिहिले आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे हजारो परदेशी प्रवासी रोज येत असतात. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ला साथीचा आजार म्हणून घोषित केल्यावरच महाराष्ट्र सरकारने कडक पावले उचलण्याची गरज होती. मात्र ते केंद्र सरकारची वाट बघत बसले. आपल्या राज्यातील लोकांना सुरक्षित ठेवणे ही राज्याची जबाबदारी असते पण महाराष्ट्र सरकार ते करू शकले नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्रातील मंत्र्यांचे आपापल्या खात्यातील काम नीट नसून त्यांच्यातील परस्पर समन्वयही नसल्याचे स्वामी यांनी लिहिले आहे. ते महाराष्ट्रातील सद्यपरिस्थितीला पूर्णतः सरकारला जबाबदार ठरवत आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची कामे व्यवस्थित न केल्याने ही स्थिती उत्पन्न झाल्याचे ते म्हणतात. हा लेख प्रसिद्ध करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आताच युती तोडा अन्यथा राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुम्हाला संपवून टाकेल असा सल्ला दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment