हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील स्थलांतरित कामगारांचे लॉकडाऊनच्या काळात होत असलेले हाल पाहता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्यातील ७० हजार पेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी २६२ निवारा केंद्रं उभारण्यात आली यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात २६२ निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये स्थलांतरित कामगार, बेघर लोक राहू शकतात. त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे असंही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना स्थलांतरित कामगारांना आहात तिथेच राहा असं आवाहन केलं होत. राज्य सरकार तुमची काळजी घेईल. तुमची सोय करेल असं आश्वासन त्यांनी काल दिलं होत. दरम्यान आज या सर्व स्थलांतरित कामगारांना दिलासा देत त्यांच्या निवाऱ्यासोबत त्यांच्या जीवनाची सोय निवारा केंद्रात केल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
Breaking | पुण्यात कोरोनाचा पहिला बळी
WhatsApp ने स्टेटस व्हिडिओ १५ सेकंदाचा का केला? जाणुन घ्या या बदलाचे कोरोना, चीन कनेक्शन
महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५वर
धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती
जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून
भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?
इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?
नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन