संगमनेर प्रतिनिधी | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि संगमनेर विधानसभेचे आमदार बाळासाहेब थोरात यांना सुखद धक्का मिळाला आहे. थोरात यांच्या नेतृत्वात सुरु असणाऱ्या सहकारी साखर कारखान्याला राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा सहकार निष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कारखान्याने साखर क्षेत्रात केलेल्या कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
खाकीवर काळा डाग ; २५ हजारांच्या लाचीसह पोलीसांनी सेक्ससाठी केली ३ मुलींची मागणी
कॉंग्रेसला चौहुबाजुने खिंडार पडत असतानाच आता बाळासाहेब थोरात यांना जाहीर झालेला पुरस्कार म्हणजे दुष्काळात दाटलेली हिरवळ आहे. कारण एकाहून एक सरस नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असतानाच आता थोरात यांच्या हातात काँग्रेसची कमान देण्यात आली आहे.अशातच त्यांच्या नेतृत्वाचा कसब बघण्यासाठी राज्यात विधानसभेची निवडणूक देखील पार पडत आहे. त्यांचा पराभव करण्यासाठी विखे पाटलांनी चंग बांधला आहे. तर काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष करून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे थोरात यांच्या साखर कारखान्याला जाहीर झालेला पुरस्कार यांचे नेतृत्व तारांकित करणारा ठरणार आहे.
शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु असतानाच छगन भुजबळ यांनी केली मोठी घोषणा
बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र राज्यात कॅबेनेट मंत्रिपद भूषवले असून त्यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशाचे प्रभारी म्हणून देखील काम पहिले आहे. त्याच प्रमाणे त्यांचे संबंध सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले असल्याने त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी असेच आहे. सातवेळा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलेल्या बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आता शालिनी राधाकृष्ण विखे पाटील या नगर जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा भाजप मधून आव्हान देणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नसणार हे मात्र नक्की.