बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; 5 आणि 7 मार्चचा पेपर लांबणीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परीक्षा तोंडावर असताना बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. भाषा विषयाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडलाच्यावतीने हा बदल करण्यात आला आहे. 5 आणि 7 मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 5 मार्च रोजी होणारा पेपर आता 5 एप्रिल रोजी होणार आहेत. तर, 7 मार्चचा पेपर आता 7 एप्रिल रोजी होणार आहे.

पेपरच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही अपरिहार्य कारणास्तव पेपर पुढे ढकलण्यात आल्याची बोर्डाने माहिती दिली आहे. येत्या चार मार्चपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. 5 मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन जपानी चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. दरम्यान 7 मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, अरेबिक, मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. मात्र, आता अवेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

बदलण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 5 मार्च रोजी होणारे पेपर आता 5 एप्रिल रोजी होणार आहेत. तर, 7 मार्चचे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहेत. 5 मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन जपानी चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. हे पेपर आता 5 एप्रिलला होतील. तर, 7 मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी,(अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. ते आता 7 एप्रिल रोजी होतील.

या दिवशी होणार प्रात्याक्षिक, श्रेणी परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुले अडचण आल्यास 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील.

Leave a Comment