माढा प्रतिनिधी |माढा लोकसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत कमळ फुलवायचेच असा चंग बांधलेल्या भाजपच्या नेत्यांनी शेवटच्या दिवशी प्रचारात चांगलीच आघाडीच घेतली आहे. भाजपचे चार बडे नेते माढा मतदारसंघात चारी बाजूने नाकेबंदी करणार असल्याचे चित्र सध्या दिसते आहे.
कुर्डूवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेवटची प्रचार सभा घेणार आहेत. सांगोल्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सभा घेणार आहेत. तर तिकडे नातेपुतेमध्ये राम शिंदे सभा घेणार आहेत. माण खटाव येथे पंकजा मुंडे सभा घेणार आहेत.त्यामुळे भाजपचे चार नेते राष्ट्रवादीची चारी बाजूने नाकेबंदी करताना दिसत आहेत.
माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघार घेतल्या पासूनच या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी चुरस निर्माण झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्या नंतर तेथे चुरस अधिकच वाढली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडून अखेर निवडणुकीच्या मुख्य प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर आज तागायत माढ्याचे राजकीय वातावरण गरमच आहे.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
महत्वाच्या बातम्या
माढ्यात प्रचाराची चुरस वाढली ; धवलदादांची घेतली रणजितदादांनी भेट
सातारा : बायकोला डबल शीट बसवून नरेंद्र पाटलांचा निवडणूक प्रचार
आश्चर्य! उस्मानाबादमध्ये लोकसभा निवडणुकीवर लागली अशी हि पैज
नरेंद्र मोदी दहावी नापास आणि प्रज्ञा ठाकूर दहशतवादी : प्रकाश आंबेडकर
राहुल गांधींच्या अडचणीत वाढ ; उमेदवारी अर्ज रद्द करण्याची ‘या’ उमेदवाराने केली मागणी