दोन्ही जागी निवडून आल्यावर तुम्ही कोणती जागा सोडणार ; आंबेडकर म्हणतात…..

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि सोलापूर आणि अकोला येथील लोकसभा उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही  जागी निवडून आल्यास कोणती जागा सोडणार या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले आहे. पत्रकारांनी असा प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकर यांनी फक्त एक स्मितहस्य केले आहे.

तुम्ही दोन्ही ठिकाणी निवडून आल्यावर कोणती जागा सोडणार या प्रश्नाचे उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणले कि,  या प्रश्नाचे उत्तर आपण आत्ताच देणार नाही. त्यांनी हे उत्तर देणे टाळल्याने त्यांना दोन ठिकाणी निवडून येण्याची खात्री नाही असेच सध्या तरी दिसते आहे.

सोलापुरातून आणि अकोल्यातून प्रकाश आंबेडकर  यांच्या समोर भाजपने तगडे आव्हान उभा केले आहे. सोलापुरात तर भाजपचे जय सिध्देश्वर शिवाचार्य स्वामी ,कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत झाली आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदार संघातून नेमके कोण जिंकणार याकडे लक्ष लागले आहे. तर तिकडे अकोल्यात देखील प्रकाश आंबेडकरांसाठी मैदान सोपे नाही.