जळगाव प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतेच पक्षात राहण्यास तयार नाहीत. त्यांच्या माझ्या मुंबईतील बंगल्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत असे ववक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. भाजपच्या विस्तार सभेत ते जळगाव मध्ये बोलत होते. याच वेळी त्यांनी विधान सभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते एवढे आमच्या मागे लागले आहेत कि त्यांना आम्हाला सांगावे लागत आहे. पुढे पाहू म्हणून. अशा परिस्थितीमुळे मला वाटते कि दोन्ही पक्षाच्या ५० जागातरी निवडून येतील का? अशी जहरी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा होत असतो. ४२ भाजपच्या कार्यकर्त्यांचे खून कम्युनिष्ट पक्षांच्या लोकांनी केले तरी देखील देशातील भाजपचे कार्यकर्ते मागे हटले नाहीत. त्यांनीच देशात भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आणले आहे असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे एकाच स्टेजवर आल्याने त्यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश हे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचे यश आहे. त्यामुळे येथील नेत्यांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. ते श्रेय ना येथील कोणत्या नेत्याचे आहे ना मुख्यमंत्र्यांचे आहे. ते श्रेय फक्त नरेंद्र मोदींचे आहे असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.




